ट्रक-कारची धडक : भीषण अपघातात काँग्रेस जिल्हा सचिवाचा जागीच मृत्यू

Asif Khan Congress - Accident

जळगाव : बुलडाणा (Buldhana) येथे ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात मुक्ताईनगरमधील काँग्रेस जिल्हा सचिवाला प्राण गमवावे लागले. कॉंग्रेसचे जिल्हा सचिव आसिफ खान (Asif Khan) इस्माइल खान यांचा जागीच मृत्यू झाला.

आसिफ खान इस्माइल खान हे औरंगाबादहून घरी परत येत होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास बुलडाणा शिंदखेडजवळ त्यांच्या कारची ट्रकला समोरासमोर धडक झाली. यामध्ये आसिफ यांचा जागीच मृत्यू झाला.

खान यांच्यासोबत गाडीत असलेले दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मुक्ताईनगरचे काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांचा समावेश आहे. यामुळे मुक्ताईनगर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER