टीआरपी घोटाळा : रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी अटकेत

Vikas Khanchandani

मुंबई : खोट्या ‘टीआरपी घोटाळा’ प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई करत रिपब्लिक चॅनेलचे (Republic) सीईओ विकास खानचंदानी (Vikas Khanchandani) यांना अटक केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघड केला होता. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते. याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली होती. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं होतं. बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.

याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली. तर रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांची चौकशी सुरु करण्यात होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER