टीआरपी घोटाळा : मुंबई पोलिसांची इंडिया टुडेला ‘क्लीन चिट’; ‘रिपब्लिक’ची होणार चौकशी

- एफआयआरमध्ये नाव पण पुरावा आढळलेला नाही !

TRP Scam

मुंबई : टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचे नाव घेतले होते; मात्र एफआयआर नोंदविण्यात आला होता. त्यात इंडिया टुडे या इंग्रजी वाहिनीचे नाव टाकण्यात आले होते. मात्र आता मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “एफआयआरमध्ये इंडिया टुडेचे नाव असले तरी त्यांच्या विरोधात पुरावा आढळला नाही. प्राथमिक माहितीमध्ये त्यांचे नाव आले होते. चौकशी केल्यानंतर रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांची नावे समोर आली. त्यामुळे त्यांची चौकशी सुरू राहणार आहे.

भारांबे यांच्या या माहितीमुळे इंडिया टुडेला ‘क्लीन चिट’ मिळाली असून रिपब्लिक टीव्हीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या एफआयआरमुळे संभ्रम वाढला होता. भारांबे यांनी मुंबई पोलिसांची बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, FIR मध्ये India Today वृत्तवाहिनीचा उल्लेख होता. मात्र आम्हाला कोणतेही पुरावे किंवा साक्षीदार आढळले नाहीत. आरोपींनी रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉस्क सिनेमा या वाहिन्यांची नावे सांगितली होती.

आता या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात हंसा रीसर्च प्रा.लि.चा रिलेशनशिप मॅनेजर विशाल भंडारी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या गुगल पे अकाउंटवरून टीव्हीधारकांना ४०० ते ५०० रुपये फॉरवर्ड केल्याचे स्क्रीन शॉट इंडिया टुडे वाहिनीवर दाखविण्यात आले आहेत. हे पैसे रिपब्लिकन वाहिनी बघण्यासाठी देण्यात आल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितल्याचे कळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER