मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान : मुस्लिमबहुल ५९ मतदारसंघांपैकी ५८ मध्ये तृणमूल जिंकली

Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिमांनी ममता बॅनर्जी (Mamata banerjee)यांचा पक्षाला एकगठ्ठा मतदान केल्याने मुस्लिमबहुल ५९ मतदारसंघांपैकी ५८ मध्ये तृणमूल (Trinamool wins in 58 out of 59 Muslim-majority constituencies) जिंकली!

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, ममतांवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप सातत्याने होतो. या निवडणुकीतही तो झाला. ही प्रतिमा बदलण्यासाठी ममतांनी चंडियाग केला. मी ब्राह्मण हिंदू असल्याचा उल्लेख जाहीर सभांमधून केला, स्वत:चे शांडिल्य गोत्रही जगजाहीर केले. परंतु या निकालात त्यांच्यामागे मुस्लिम मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बंगालमध्ये ध्रुवीकरण झाले, परंतु मुस्लिमांची एकगठ्ठा मते ममतांना पडली, या उलट हिंदू मतांची विभागणीच जास्त झाली.

मालदा-मुर्शिदाबादसारखे मुस्लिमबहुल मतदारसंघ जे आधी काँग्रेसचे बालेकिल्ले होते, तिथे तृणमूलला मोठे यश मिळाले. फक्त हे दोनच मतदारसंघ नाही, तर बंगालमधील एकूण ५९ मुस्लिमबहुल मतदारसंघांपैकी ५८ मध्ये तृणमूलचा मोठा विजय झाला.

बंगालमध्ये सुमारे ३० टक्के मुस्लिम मतदार आहेत. ते यावेळीही निर्णायक ठरले. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, बीरभूम, दक्षिण २४ परगणा आणि कूचबिहार, येथे मुस्लिमांची मोठी लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, मुर्शिदाबादमध्ये ६६.२, मालदामध्ये ५१.३, उत्तर दिनाजपूरमध्येही ५०, बीरभूममध्ये ३७, दक्षिण २४ परगनामध्ये ३५. ६ आणि कूचबिहारमध्ये २५. ५४ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे.

बंगालच्या तब्बल १२५ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक ठरत आले आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, ज्या पक्षाकडे मुस्लिम मतदारांचा कल असतो, बंगालमध्ये त्यांचेच सरकार बनते. आतापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की, मुस्लिमांनी कोणत्याही एकाच पक्षाला मतदान केलेले नाही, परंतु यावेळी पहिल्यांदा मुस्लिम मतदार तृणमूलसोबत उभा असलेला दिसला. यापूर्वी मुस्लिम मतदार हे तृणमूलसोबतच काँग्रेस आणि डाव्यांमध्ये विभागलेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button