तृणमूल काँग्रेस २०२१ ची निवडणूक जिंकणार नाही – सुवेंदू अधिकारी

Suvendu Adhikari

कोलकाता : तृणमूलचे माजी नेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. ममता बॅनर्जींवर टीका करताना अधिकारी म्हणालेत, तृणमूल काँग्रेस २०२१ ची विधानसभेची निवडणूक जिंकणार नाही.

ते म्हणालेत, ममता बॅनर्जी कुणाच्याच नाहीत. तृणमूल काँग्रेसमध्ये माझा प्रचंड मानसिक छळ झाला. ज्या नेत्यांनी मला त्रास दिला ते आता मला पाठीत खंजीर खुपसणारा माणूस म्हणत आहेत. एक गोष्ट खात्रीने सांगतो. २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेस जिंकणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER