राज्यसभेत भाषण देताना तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने केली राजीनाम्याची घोषणा !

- ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का

दिल्ली :  राज्यसभेत अर्थसंकल्पावर (budget in the Rajya Sabha) चर्चा सुरू असताना नाट्यमय घडामोड घडली. तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी, पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल घुसमट होत असल्याची खंत व्यक्त करत भाषणातच खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्रिवेदी म्हणालेत, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार रोखण्यासाठी आपण काही करत नाही.

त्यामुळे माझी घुसमट होते आहे. आपण येथे बसूनही काहीच करू शकत नाही तर राजीनामा दिला पाहिजे, असे माझे मन सांगते. मी बंगालच्या लोकांसाठी काम करत राहीन. मला राज्यसभेत पाठवल्याबद्दल मी माझ्या पक्षाचा आभारी आहे, असे म्हटल्यानंतर त्रिवेदी यांनी मोदींची स्तुती केली. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता एका वृत्तवाहिनीने व्यक्त केली आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत. तृणमूलच्या अनेक नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) संतप्त झाल्या आहेत. दिनेश त्रिवेदी यांच्या राजीनाम्याने त्यात भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER