कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर आठवडाभरासाठी बंद

trimbakeshwar-temple-closed-for-a-week - Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे . नाशिक जिल्ह्यात देखील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर देवस्थानाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे आठवडाभरासाठी बंद राहणार आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर हे 29 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे. कोरोणाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने त्र्यंबकेश्वर नगरीत भीतीचे वातावरण आहे. देशातील वेगवेगळ्या भागातून भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भाविकांनी त्र्यंबकेश्वरात न येण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजभळ यांनी नियम पाळले गेले नाहीत तर लॉकडाऊन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button