पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधींकडून अहमद पटेल यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

Ahmed Patel

नवी दिल्ली :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. पटेल यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही अहमद पटेल (Ahmed Patel) यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधानाने दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. ते एक उत्तम खासदार होते असंही राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. उत्तम गुण आणि नेतृत्वाचे ते अगदी योग्य उदाहरण होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे प्रत्येक पक्षात मित्र होते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण एक चांगला मित्र, सहकारी आणि कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटवरुन अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी समाजाच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. ते त्यांच्या तल्लख बुद्धीसाठी ओळखले जायचे. काँग्रेसला शक्तीशाली पक्ष म्हणून उभं करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायमच लक्षात राहिलं असंही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो, असं मोदींनी ट्विटच्या शेवटी म्हटलं आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. आम्हाला सदैव त्यांची उणीव जाणवत राहिल. या दुःखाच्या प्रसंगी फैजल, मुमताज आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER