मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा

Maharashtra Today

मुंबई : तथागत गौतम(Tathagata-gautam-buddha) बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहे, असे विनम्र भाव व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी उद्याच्या (बुधवारी) बुद्धपौर्णिमेनिमित्त(buddha purnima) जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजच्या घडीला अधिक समर्पक आहे. यातच त्यांच्या विचारांची सार्वकालिकता आहे. बुद्धपौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम आणि या पवित्र पर्वानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा,असे उद्धव ठाकरे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button