कोल्हापूर महापालिकेच्यावतीने कै.गंगाराम कांबळे यांना आदरांजली

tribute to Gangaram Kamble

कोल्हापूर :- कै.गंगाराम कांबळे यांच्या पुण्यदिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज, शुक्रवारी सकाळी टाऊन हॉल जवळील त्यांच्या स्मृतिस्तंभास महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

यावेळी नगरसेविका सौ.मेहजबीन सुभेदार, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांनी जातीभेदाच्या भिंती हाणून पाडण्यासाठी गंगाराम कांबळे यास चहाचा गाडा सुरू करून दिला.

ही बातमी पण वाचा : बारावी परीक्षेचा पेपर तपासणीचा तिढा सुटला

शाहू महाराज दररोज अंबाबाई च्या दर्शनासाठी याच मार्गावरून जात. यावेळी महाराज मुद्दाम गंगाराम कांबळे यांच्या स्टॉलवर थांबून चहा पीत. स्वतः महाराज अस्पृश्य समाजातील व्यक्तीच्या हातून चहा घेऊ लागल्याने त्यांचे सरदार आणि इतरांनाही अनुकरण करणे भाग पडले. शंभर वर्षांपूर्वी महाराजांनी कोल्हापुरात केलेल्या या प्रयोगाचे खूणगाठ भाऊजींची रोडवर अस्तित्वात आहे. ज्या ठिकाणी गंगाराम कांबळे याचा स्टॉल उभारण्यात आला होता त्या ठिकाणी मोठा स्तंभ उभारण्यात आला आहे. गंगाराम कांबळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापौरांनी अभिवादन केले. दिवसभर या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.