पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, अजित पवारांकडून श्रद्धांजली

Vasantrao Vani - Ajit Pawar

मुंबई : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते वसंतराव वाणी (Vasantrao Vani) यांचे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वसंतराव वाणींना श्रद्धांजली अर्पण केली.

ज्येष्ठ नेते आणि पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक वसंतराव वाणी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ट्विट अजित पवारांनी केले आहे .

वाणी यांनी राष्ट्रवादीचा (NCP) राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य होते. प्रमोद महाजन (Pramod Mahajan), नितीन गडकरी (Nitin Gadkari), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) अशा ज्येष्ठ नेत्यांचे ते निकटवर्तीय मानले जात. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप उभारणीत वसंतराव वाणी यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. एक धडाडीचा संघटक म्हणून पिंपरी चिंचवड शहराला त्यांची ओळख होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER