श्रद्धांजली : दुबईत ‘बुर्ज खलिफा’वर महात्मा गांधींची प्रतिमा प्रकाशित !

Dubai

दुबई : शुक्रवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१ वी जयंती जगभर विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जगातील सर्वात उंच इमारत, ‘बुर्ज खलिफा’वर महात्मा गांधींची प्रतिमा भारतीय ध्वजासह ‘तुम्ही आज काय करता यावर भविष्य अवलंबून आहे’ या संदेशासह प्रकाशित करण्यात आली.येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने त्यांच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधीचे समरण केले.

अमेरिकेच्या संसदेच्या खालच्या सभागृहातील प्रतिनिधींनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण वाहिली. गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार रोहित खन्ना यांनी संदेश पोस्ट केला – बापूंनी आम्हाला शिकवले आहे की न्यायासाठी सर्वोत्तम लढा अहिंसेच्या तत्त्वांसह लढला जाऊ शकतो.

चीननेही महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. चीन म्हणाला – बापूंचे तत्त्वज्ञान आपल्याला नेहमी प्रेरणा देईल. पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातही गांधी जयंती साजरी करण्यात आली. गांधी जयंतीनिमित्त युक्रेनच्या कीवमध्ये बापूंच्या कास्याच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

अमेरिकेचे खासदार टॉम सूझी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले – त्यांनी आपल्या कार्याचा प्रभाव अनेकांवर टाकला आहे. खासदार टी. जे. कॉक्ससा आणि माईक फिट्जपॅट्रिक यांनीही श्रद्धांजली वाहिली. खासदार अ‍ॅमी बेरा यांनी म्हटले की, ‘गांधी हे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER