गडचिरोलीत आदिवासी महिलेची जंगलात झाडाखाली प्रसूती

Tribal woman in Gadchiroli gives birth under a tree in the forest

गडचिरोली :  आदिवासींचा जिल्हा म्हणून असलेली गडचिरोलीची (Gadchiroli) ओळख आहे. देश, राज्य कितीही पुढारले असले तरी गडचिरोलीवासीयांच्या समस्या मात्र आजही जैसे थे च आहेत असे वेळोवेळी अनेक उदाहरणांतून दिसून येते. सध्याचे पावसाळ्याचे दिवस. त्यातच मागिल आठवड्य़ापासून सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले. नदी नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या स्थितीत एका आदिवासी महिलेची(Tribal woman) भर जंगलात झाडाखाली (woman gave birth) प्रसूती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात (Etapalli taluka) घडली.

भारती दोरपेटी असे या महिलेचे नाव आहे. ती एटापल्ली तालुक्यातील गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र गट्टाच्या झारेवाडा गावात ती राहते. पाण्यामुळे सर्वत्र चिखल व रस्ते बंद असल्याने वेळेत रुग्णवाहीका महिलेपर्यंत पोहचू शकली नाही. त्यातही सकारात्मक बाबा म्हणजे रूग्णवाहिका जाऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर तात्काळ निर्णय घेऊन सोनी दुर्गे यांनी प्रसूतीला लागणाऱ्या आपल्या साहित्यासह ते गरोदर भारतीला जिथे घनदाट जंगलातील पायवाट रस्त्यातून आणले होते ते स्थळ गाठले व जंगलातच तिच्या प्रसूतीची तयारी सुरू केली. काही वेळात आरोग्यसेविका सोनी दुर्गे यांच्या अथक प्रयत्नाने आदिवासी भारतीची प्रसूती झाली आणि भारतीने कन्येस जन्म दिला. नवजात बाळाचे वजन दोन किलो सातशे ग्राम असून पुढील उपचारासाठी दोघांनाही गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

कंत्राटी आरोग्य सेविका सोनी दुर्गे आणि आशा सेविका सविता आलाम यांनी वेळीच धावपळ नसती केली तर बाळाच्या आणि भारतीच्या जीवास धोका निर्माण झाला असता. परिस्थितीवर मात करून या आरोग्य सेविका सोनी दुर्गे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.

मागील महिन्यात भामरागड तालुक्यात अशीच घटना घडली होती. एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी तब्बल 23 किलोमीटर घनदाट जंगलातून नदी नाल्यांच्या पाण्याच्या प्रवाहातून पायपीट करत रुग्णालय गाठावं लागलं होतं तर दुसरी घटना त्याच भागात घडली होती ज्यात एका गरोदर मातेला वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच प्राण गमवावे लागले होते. गडचिरोलीतील आता ही तिसरी अशी घटना आहेजेथे गरोदर मातेला भर जंगलात झाडाखाली आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER