काॅलेजसाठी ट्रेंडी हेअरस्टाईल

Hairstyle

१२वी च निकाल लागताच काॅलेज मध्ये अॅडमिशनसाठी मुल-मुलींची रांग लागतात. एकदा काॅलेज काय सुरु झाले की मघ मुला-मुलींची फॅशन सुरु. विशेषता मुलींची. इतकी वर्ष दोन वेणी आणि युनिफार्म घातली, मघ आता फॅशन नाही करणार तर मघ कधी करणार. पण तुमच्या रोजचा कालेज लुक ट्रेंडी करण्यासाठी हेअरस्टाईलसुद्धा तितकीच महत्वाची असते. पहा या काही सोप्या हेअरस्टाईल ज्या तुम्हाला देतील कालेजमधला परफेक्ट यंग लुक.

  • पोनी टेल :- पोनी टेल बांधन ही मुळात तरुण असण्याच प्रतिक आहे. अशी कोणतीही काॅलेज गर्ल नाही जिने आपल्या वेस्टर्न कपड्यांवर ही हेअरस्टाईल कॅरी केली नसेल. ही हेअरस्टाईल सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि सोप्पी आहे. आपले सगळे केस एकत्र घेऊन एका रबर बँँडने नाॅर्मल उंचीवर किंवा थोडा हाय पोनी बांधावी.

  • हाय पोनी अँड पफ :- ही थोडी स्टाइलीश लुक देणारी आहे. समोरच्या केसांचा पफ करून नंतर उंच पोनी बांधून हा छान लुक मिळवता येतो.

  • मेसी लुक ब्रेअड :- मुळच्या भारतीय वेणी या प्रकाराच हे फ्रेंच व्हर्जन. दिपिका पदुकोन पासून तर आलीय भट्ट बऱ्याचदा ही हेअरस्टाईल फाॅलो करताना दिसतात. वेणी बांधतांना थोडी सैलसर बांधावी आणि बांधलेल्या वेणीतून थोडे थोडे केस बाहेर काढावेत. मोठ्या लेन्थच्या आणि स्ट्रेट केसांसाठी ही स्टाईलिश आणि वेगळा लुक ट्राय करू शकता.

  • सिंपल टाॅपनाॅट :- काही केस घेऊन बाकीचे तसेच खाली ठेऊन काहीसा ग्लॅमरस अंबाडा म्हणजे सिंपल टाॅपनाॅट. या हेअरस्टाईलवर फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि लेक्चरला लेट झाल असेल तर ही पटकन होणारी हेअरस्टाईल आहे.

  • पिगटेल बाॅक्सर ब्रेअड :-  शाळेतील दोन वेण्यांच हे आंतरराष्ट्रीय व्हर्जन अस म्हणता येईल. युएस आणि युरोपमध्ये ही हेअरस्टाईल फार लोकप्रिय आहेच, आता भारतातही मुली ही फाॅलो करताना दिसतात. स्टडी टूरला जाताना ही हेअरस्टाईल करायला हरकत नाही. मात्र त्यासोबत डगरी किंवा जंपसूट पेअर करावे.