नागपुरातील रुग्णालयात पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांचा एकाच बेडवर उपचार

Maharashtra Today

नागपूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना(Corona) विषाणूचा विळखा वाढतच चालला आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह नागपूरही कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट ठरत आहे. यामुळे याचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर पडत आहे. परिणामी रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाकडून त्यांची हेळसांड होत आहे. प्रशासनाला ऑक्सिजनसोबतच बेड्सची कमतरता सतावत आहे. रुग्णालयात बेड्सची कमतरता असल्याने दोन कोविड पॉझिटिव्ह आणि कोविड संशयित रुग्णांचा एकाच बेडवर उपचार करत आहेत.

नागपूरची आरोग्य यंत्रणाही याला अपवाद नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे. रोज ३ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. ज्या रुग्णांना कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे आहेत. अशा रुग्णांचा घरीच उपचार सुरू आहेत. मात्र ज्यांची प्रकृती अस्थिर आहे, अशा रुग्णांचा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. नागपूरातील शासकीय महाविद्यालयात बेड्सच्या कमतरतेमुळे पॉझिटिव्ह(Positive Patient) आणि संशयित रुग्णांना (Suspect Patient)एकाच बेडवर बसवून उपचार केले जात आहेत. अशाने अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. नागपूरमध्ये बहुतांशी सरकारी रुग्णालयाची हीच स्थिती पाहाता नागरिकांमध्येही चितेंचे वातावरण आहे.

नवीन रुग्ण सापडण्याच्या बाबतीत भारताने काल गेल्या वर्षातील सर्व विक्रम तोडले आहे. भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ०३ हजार ८४४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता अमेरिकेनंतर भारत जगातला दुसरा देश ठरला आहे,

ठिकाणी एका दिवशी कोरोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहे. यामुळे आता जागोजागी कडक निर्बंध लादले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button