परिवहन मंत्री अनिल परब कोरोना बाधित, रुग्णालयात दाखल

Anil Parab Corona Poitive

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या अनिल परब यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आढावा बैठक झाली या बैठकीला अनिल परब हजर होते.

आत्तापर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनजंय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्जामंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही करोनाची बाधा झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER