निलेश राणे यांच्याविरोधात तृतीयपंथीयांनी केला गुन्हा दाखल ; ‘हिजडा’ शब्द भोवला

transgender-activist-filed-complaint-against-nilesh-rane

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्याविरुद्ध तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. उपहासात्मक ‘हिजडा’ शब्दप्रयोग केल्याप्रकरणी फैजपूर (ता. यावल, जि.जळगाव) अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती.

ही बातमी पण वाचा:- हिजडा’ शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते: तृतीयपंथियाचे निलेश राणेंना खडेबोल 

नालसा प्राधिकरणाच्या 2014 च्या दीर्घ अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकारे यांनी तृतीयपंथी अर्थात सांस्कृतिक ओळख ‘हिजडा’ असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून प्रशासकिय शब्द ‘तृतीयपंथी’ अशी लिंग मान्यता दिलेली आहे. कुठल्याही लिंग जातीधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारा व सामाजिक कृती पोहोचवणे गुन्हा आहे. तरी निलेश नारायण राणे यांनी भादंवि Defamation Act 499 नुसार मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृतीयपंथी स्वतःची सांस्कृतिक व सामाजिक ओळख ठेवून आहे. त्यांच्या संघर्षाविषयी कुठलीही जाणीव नसलेले लोकप्रतिनिधी निलेश नारायण राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य केले. ‘हिजडा’ असा शब्दप्रयोग करणे अशोभनीय असल्याचे शमिभा पाटील यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे व त्यांच्या विरोधी असलेले आमदार रोहित पवार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात चालत असलेल्या सोशल मीडियावरील राजकीय वाक्युद्धात निलेश राणे यांनी 19 मे रोजी सायंकाळी आपल्या ट्विटर अकाउंटवरून (‘हिजडा’ शब्दप्रयोग उपहासात्मक पद्धतीने केला होता. यामुळे तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER