गृह विभागाकडून चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Tejaswi Satpute & Ashok Dudhe

मुंबई : राज्य गृह विभागाने सोलापूर, सातारा, रायगड या जिल्ह्यांच्या  पोलीस अधीक्षकपदी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या मोठ्या  प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणच्या बदल्या होणे अद्यापही बाकी आहे. त्यापैकी राज्य गृह विभागाने आज काही ठिकाणच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

प्रतीक्षाधीन असलेले अशोक दुधे यांची रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतीक्षाधीन अजयकुमार बन्सल यांची सातारा पोलीस अधिक्षकपदी, तेजस्वी सातपुते यांची पोलीस अधीक्षक, सोलापूर तर कुमार चिथा यांची सहायक पोलीस अधीक्षक/ उप- सहायक पोलीस अधीक्षक/ उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव येथे बदली करण्यात आली आहे.

PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER