सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Transfer

मुंबई : विजय सिंघल यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुंबई या रिक्त पदावर करण्या आली आहे. किशोर राजे यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव नियुक्त करण्यात आले आहे. असीम कुमार गुप्ता (प्रधान सचिव, ऊर्जा) यांची नियुक्ती प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन), महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई येथे झाली आहे.

दिनेश वाघमारे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मुंबई) यांची नियुक्ती प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई पदावर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER