तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश १५ दिवसांत रद्द

Tukaram-Mundhe-NMC

मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या बदलीचे आदेश (Transfer order) रद्द करण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran) येथे सदस्य सचिव म्हणून बदली झाली होती. राज्य सरकारने १५ दिवसांत हे आदेश मागे घेतले आहेत.

तुकाराम मुंढे काही दिवसांपूर्वीच कोरोनातून बरे झाले आहेत. २६ ऑगस्टला त्यांची मुंबईत बदली करण्यात आली होती. त्यांचा नागपूर महापालिका आयुक्तपदाचा प्रभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे यांची जानेवारी महिन्यातच नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली होती. अवघ्या सात महिन्यांत त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली. आता १५ दिवसांत ती रद्द करण्यात आली आहे!

तुकाराम मुंढे यांना बदलीनंतर देण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव आहेत.

इतर बदल्या

किशोरराजे निंबाळकर – सचिव, मदत व पुनर्वसन यांना सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे (तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करून).

एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर पदावर करण्यात आली. हे पद रिक्त होते.

ई. रवींद्रन यांची नियुक्ती सह-विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER