महात्मा फुले जनारोग्य योजनेचे प्रमुख सुधाकर शिंदे यांची बदली थांबवली

Sudhakar Shinde

मुंबई : महात्मा फुले जनारोग्य योजनेचे प्रमुख सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांची बदली सरकारने थांबवली आहे.

कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात मास्कचा काळाबाजार सुरू झाला होता. त्यावेळी मास्कचे दर नियंत्रणात आणण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने उपाय योजून मास्कचे दर नियंत्रणात आणले. शिंदे त्या नियंत्रण समितीचे प्रमुख होते.

शिंदे यांनी मास्कचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कडक कारवाईमुळे काही लोक दुखावले आणि शिंदे यांची बदली करण्यात आली, अशी चर्चा सुरु झाली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याचे खंडन केले. शिंदे यांची बदली नियमित प्रक्रियेत करण्यात आली असे सांगितले.

आता शिंदे यांची बदली थांबवताना टोपे म्हणाले की या ठिकाणी चांगल्या माणसाची गरज असल्याने त्यांची बदली थांबण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER