सनदी अधिकारी चोकलिंगम, हर्डीकर, शीतल उगले-तेली यांच्यासह सात जणांच्या बदल्या

मुंबई :- जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे एस. चोकलिंगम यांची बदली यशदा पुणेच्या महासंचालक पदावर करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे येथे करण्यात आली आहे. हर्डीकर यांच्या जागी ओडिसा केडरचे राजेश पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त आहेत.

शीतल उगले-तेली यांची नागपूर येथे संचालक, वस्त्रोद्योग म्हणून बदली झाली आहे. पुण्यात अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.

पनवेलमध्ये भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमी  अभिलेखमध्ये असलेल्या अनिता पाटील यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झालेले एन. के. सुधांशु यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे या पदावर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER