सातारा पोलीस अधीक्षकाची बदली : शंभुराज देसाईंच्या हट्टामुळेच बदलीची चर्चा

तेजस्वी सातपुते-Shambhuraj Desai

सातारा : सातारा पोलीस दलाची प्रतिमा उंचावणाऱ्या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच सातपुते यांची बदली झाल्याने सातारकऱ्यांत नाराजी आहे. राज्यमंत्री झाल्यापासून शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी तेजस्वी सातपुते (Tejasvi Satpute) यांची बदली करण्याचा हट्ट धरला होता. देसाई यांच्या हट्टामुळेच सातपुते यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला सातारा मुकल्याची भावना व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आठ महिन्यांनी महसूल आणि पोलीस विभागातील बदल्यांचा धडाका लावला आहे.

भाजप सरकारचा माणूस हा कार्यकाल पूर्ण होण्याआधी बदली करण्यामागील निकष लावल्याची जोरदार चर्चा होती. दरम्यान, सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली करण्याची मागणी शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे केली होती. आठ महिने होऊनही बदली होत नसल्याने देसाई यांनी याबाबत पुन्हा जोरदार फिल्डिंग लावली होती.

सातारा अधीक्षकांची बदली शंभुराज देसाई यांनी राजकीय प्रतिष्ठतेचा विषय केल्याची चर्चा आहे. सातपुते यांच्या जागी अजयकुमार बन्सल यांची नेमणूक सातारा पोलीस अधीक्षकपदी झाली. त्याचबरोबर अशोक दुधे यांची रायगड पोलीस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER