पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : अमिताभ गुप्ता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त

Amitabh Gupta New Commissioner of Police.jpg

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा (Corona Virus) हाहाकार तर दुसरीकडे विविध विभागांतील बदल्यांचे सत्रदेखील सुरूच आहे. ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Govt) अधिका-यांच्या बदल्या हे नित्याचेच झाले आहे असे म्हणण्यास वाव आहे. रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तब्बल ६० हून अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. त्यांच्या जागी विनीत अगरवाल प्रधान सचिव गृह (विशेष) हे जागा सांभाळणार आहेत तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियुक्ती झालेल्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सव पार पडताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी इतर अधिकाऱ्यांसह २२ जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे. कोणत्या अधिका-यांची कुठे बदली झाली आहे, याविषयी सविस्तर माहिती बातमीसोबत जोडली आहे.

Check PDF

Check PDF

Check PDF

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER