आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढे राज्य मानवाधिकार आयोगाचे नवे सचिव

Tukaram Mundhe

मुंबई : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अरविंद कुमार (Arvind Kumar), आयएएस (1985), एमडी, एमपीसीएल, मुंबई यांना अतिरिक्त मुख्य सचिव (सहकार), सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त केले गेले आहे. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe), आयएएस (2005) यांना राज्य मानवाधिकार आयोग, मुंबईचे सचिव म्हणून नियुक्त केले गेले आहे.

डी.बी.गवाडे (D.B.Gawade), आय.ए.एस. (2007)) यांना सहसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त केले गेले आहे. उदय जाधव (Uday Jadhav), मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल रूरल लवलीहूड मिशन, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग, मुंबई सचिव म्हणून नियुक्त केले गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER