राज्यात सनदी अधिका-यांच्या बदल्या

Mumbai Mantralaya

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रालयात बड्या अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सामान्य प्रशासन विभागाने काही सनदी अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. विकास खारगे, प्रधान सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

तथापि, पुढील आदेशापर्यंत त्यांच्या सध्याच्या प्रधान सचिव (वने) या पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे असणार असल्याचे सीताराम कुंटे, अपर सचिव (सेवा) यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्याच प्रमाणे सचिन कुर्वे यांची महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या महाप्रबंधकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय निपुण विनायक यांची पालिका प्रशासनाचे संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आनंद रायते यांची विक्रीकर विभागाचे सहआयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.