अनिल देशमुख प्रकरणाची सुनावणी दुस-या खंडपीठाकडे वर्ग करा, नवी याचिका दाखल

Dr. Jayashree Patil - Anil Deshmukh

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पदावर असताना देशमुख यांची चौकशी करणाऱ्या पोलिसांवर दडपण येऊ शकते. त्यामुळे देशमुख यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी याचिका डॉ. जयश्री पाटील (Dr. Jayashree Patil) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल केली होती. साध्य या याचिकेवर मुंबई उच्च नयायलायातील न्यायमूर्ती एस. काथावाला यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. मात्र आता जयश्री पाटील यांनी मुंबई उच्य न्यायालयात दुसरी याचिका दाखल करत या प्रकरणाची सुनावणी दुस-या खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.

रात्री ९ नंतर उशिरापर्यंत सुनावणी घेण्याची गरजच काय?, इतक्या तातडीनं सुनावणी कोणासाठी?, असा सवाल पाटील यांनी नव्या याचिकेत केला आहे. न्यायालयाने माझे म्हणणे ऐकून घेतलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी दुस-या खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन सुनावणी सुरू होती. त्यानंतर ही याचिका दाखल केली गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button