धुळ्यात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, पायलटसह पाच जखमी

dhule-plane-crash

धुळे: येथील साक्रीजवळील शेवाळी फाट्याजवळ प्रशिक्षणार्थी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळले असून अपघातात विमानाच्या पायलटसह दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पायलटसह 2 महिला प्रशिक्षणार्थी असे एकूण 5 प्रशिक्षणार्थी असलेले हे विमान सुरतहून धुळ्याकडे जात असताना सात वाजून 45 मिनिटांच्या सुमारास साक्रीमधील शेवाळी फाट्याजवळ असलेल्या दातर्ती गावाजवळ बॉम्बे फ्लाईंग क्लबच्या विमानाचे क्रॅश लँडिंग झाले.

विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलट जे. पी. शर्मा यांनी तात्काळ विमान नागरी वस्तीपासून दूर नेले. त्यामुळे पायलटने वेळीच दाखवलेल्या या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातात पायलट जे. पी. शर्मा किरकोळ जखमी झाले असून बाकीचे प्रशिक्षणार्थी सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, पायलट जे.पी. शर्मा यांना प्राथमिक उपचारांसाठी साक्री येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.