मुंबईत ऑक्टोबर पर्यंत सुरू होऊ शकते ट्रेन, आदित्य ठाकरेंनी दिले संकेत

Aaditya Thackeray - Train

मुंबई : मार्च महिन्यापासून देश लॉकडाऊनमध्ये (Lockdown) आहे. पहिले तीन महिने कडक लॉकडाऊन (Lockdown) पाळल्यानंतर अनलॉकची (Unlock) प्रक्रिया देशात, राज्यात सुरू झाली. कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता देश अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात आहे. देशाची, राज्याची आर्थिक घडी, अर्थव्यवस्थेचं रुतलेलं चाक हलविण्यासाटी सर्व व्यापार, उद्योग, कारखाणे सुरू करण्यात आलेत मात्र, परिवहन सुविधा त्या प्रमाणात अद्याप सुरू झालेली नाही.

त्यातच मुंबईची (Mumbai) जीवनवाहिनी लोकल सुरू न झाल्यानं मुंबईकरांचा संताप झाला आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा देणा-या सरकारी कर्मचा-यांसाटीच लोकल सेवा सुरू आहे.

परंतु, अनलॉक पाच नंतर ऑक्टोबर महिन्यात ट्रेन सुरू होणार असे संकेत मुंबई उपनगरचे पालकमंत्री, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले.

ते म्हणाले, ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात लोकल सुरु करण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान, आता जरी ट्रेन सुरु असली तरी ती केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु आहे. तसेच, पुन्हा एकदा २४ तास ऑफिसेसही सुरु करण्याचा विचार करत असल्याची माहिती देखील आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

तसेच, हळूहळू मुंबईत सर्व काही पुर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. लोकांची गर्दी पुन्हा रस्त्यावर दिसू लागली आहे. तसेच, लवकरच रेस्टॉरंटदेखील सुरु करण्याच्या विचारात आहोत. जोपर्यंत आपल्याकडे पुरेशी आरोग्य सेवा आहे, ऑक्सीजन, व्हेटींलेटर या सर्व बाबी पुरेशा आहेत त्या आधारे आपण हळूहळू सर्व काही उघडण्यास सुरुवात करु शकतो. अर्थात हे सर्व काही लोकं कशा पद्धतीने काळजी घेतात, सॅनिटायझेशन करतात यावर अवलंबून आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER