पुण्यात बसणार रेल्वे अपघात रोखणारी ट्रेन कोलीजन अव्हाईड सिस्टिम

Railway

पुणे :- रेल्वे बोर्डाने प्राधान्याने सुवर्ण चतुष्कोन व सुवर्ण कर्ण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाडीत व मार्गांवर टीसीएएस प्रणाली (ट्रेन कोलीजन अव्हाईड सिस्टिम) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे रेल्वेस्थानक हे सुवर्ण चतुष्कोन मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. शिवाय स्वतंत्र लोकोशेडही आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थनाकावरून धावणाऱ्या गाड्यांमध्ये याची लवकरच अंमलबजावणी केली.

पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या प्रवासी रेल्वेच्या इंजिनमध्ये लवकरच टीसीएएस यंत्रणा बसवली जाणार आहे. यामुळे तांत्रिक चुकीमुळे होणारे रेल्वे अपघात टाळता येणे शक्य होणार आहे. पुणे लोकोशेडमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या इंजिनमध्ये ही यंत्रणा बसवली जाणार आहे. पुणे ते दौंडदरम्यान सेक्शनमधील रुळांवर तसेच सिग्नलजवळ ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

सिग्नलमधील दोषांमुळे अथवा चालकाने लाल सिग्नलचे उल्लंघन करून रेल्वे पुढे नेल्यानंतर त्याच मार्गावर समोरून येणाऱ्या रेल्वेशी टक्कर होऊन अपघात होतो. हा अपघात रोखण्यासाठी तसेच सिग्नलचे उल्लंघन होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे इंजिनमध्ये टीसीएएस ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ इंजिनमध्येच नाही तर रुळांवर व सिग्नलजवळच्या भागातही ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे वाढणाऱ्या वेगावर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच चालकाला जर सिग्नल लाल असेल तर त्यावेळीही ‘अलर्ट केले जाणार आहे. जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रेल्वे अपघात टाळण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER