भंडारा रुग्णालयातील दुर्घटना मन हेलावणारी – नितीन गडकरी

Nitin Gadkari

दिल्ली :- भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये आग लागून झालेल्या अपघातात १० बालकांचा मृत्यू झाला. या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या अपघाताबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शोक व्यक्त केला. गडकरी यांनी ट्विट केले, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Bhandara District General Hospital) अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दर्दैवी आणि मन हेलावणारी आहे.

ज्या कुटुंबातील बालकांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना. या कक्षात १७ बालके होती, असे कळते. त्यातील सात बालकांचा धुराने जीव गुदमरून आणि तिघांचा होरपळल्याने मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER