रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक पोलिसाने केली भटक्या कुत्र्याला मदत !

वाहतुकीचा रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक पोलिसाने (Traffic police) भटक्या कुत्र्याला (stray dog) केलेल्या मदतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ कुठला आहे याची माहिती नाही. एक भटका कुत्रा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो. पण, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमुळे त्याला रस्ता ओलांडता येत नाही. तो वारंवार रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो; पण धावणाऱ्या वाहनांमुळे त्याला थांबावे लागते.

कुत्र्याची ही अडचण तिथे वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसाच्या लक्षात येते. तो कुत्र्याजवळ जातो. त्याला हाताने थांबण्याचा इशारा करतो. पोलिसाने आपली दखल घेतली आहे हे कुत्र्याच्या लक्षात येते. तो थांबतो. वाहनांची संख्या कमी झाल्यावर पोलीस रस्त्यावरची वाहतूक थांबवतो. स्वतः रस्त्यावर उभा राहतो आणि कुत्र्याला रस्ता ओलांडण्याचा इशारा करतो. कुत्रा रस्ता ओलांडून जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER