नक्षलवाद्यांच्या गडचिरोली बंदमुळे वाहतूक विस्कळीत

gadchiroli-band

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या १९ मेच्या बंदचा परिणाम जाणवू  लागला आहे. गडचिरोलीच्या काही भागांत वाहतूक बंद पडली आहे. नक्षलवाद्यांनी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर झाडे आडवी टाकून मार्ग बंद पाडला आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील बससेवाही बंद आहे.

गुरुपल्लीजवळ वन विभागाची लाखो रुपयांची लाकडेही नक्षल्यांनी जाळली आहेत. २७ एप्रिल रोजी रामको आणि शिल्पा यांच्या चकमकीतील मृत्यूच्या निषेधार्थ हा गडचिरोली बंद माओवाद्यांनी घोषित केला आहे. जाळपोळ आणि ठिकठिकाणी पत्रकं, फलक लावून लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. पोलिसांनी अलर्ट जारी केला असून नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.