उद्धव ठाकरेंना व्यापाऱ्यांनी ‘लॉकडाऊन’ मागे घेण्याचा दिला अल्टिमेटम!

uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई :- सुमारे ७५० हून अधिक व्यापारी संघटनांची मुख्य संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जीवनावश्यक दुकाने उघडण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. यात सदस्यांची संख्या जवळपास २० लाख इतकी आहे.

सोमवारी रात्रीपासून वाहतूक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व दुकाने उघळण्यास ३१ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. एफएएमचे अध्यक्ष विनेश मेहता म्हणाले की, “गेल्यावर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आम्ही आता कुठे सावरत होतो. या नवीन निर्बंधांमुळे व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आहे. हे असेच चालू राहिले तर आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही.”

एफएएमने निर्णय घेतला आहे की, मुख्यमंत्र्यांनी २४ तासांच्या अल्टिमेटमकडे लक्ष न दिल्यास व्यापारी काळ्या पट्ट्या आणि मुखवटे घालून दुकानांवर येतील आणि गुरुवारी दुपारी निषेध करतील. हा सरकारी यंत्रणेला पुढील इशारा असणार आहे.

“व्यापाऱ्यांना कामगारांचा पगार, कर, जीएसटी, भाडे द्यावे लागेल, पैसे कुठून येतील? सरकारने आमच्या निषेधाकडे लक्ष न दिल्यास आम्ही आपले आंदोलन अधिक तीव्र करू.” असे उपाध्यक्ष जितेंद्र शाह म्हणाले.

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, “जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर दुकानांसाठी आठवड्यातून तास किंवा २ ते ३ दिवस दुकान उघडण्याची मुभा द्यावी. छोटे दुकानदार पुढील तोटा सहन करू शकणार नाहीत.” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुचवले की, हा लॉकडाऊनच आहे. पण त्याला वेगळे नाव दिले आहे. त्यामुळे ही अधिसूचना मागे घ्यावी.

ही बातमी पण वाचा : ‘निर्बंधाच्या नावाखाली कडक लॉकडाऊन का? काँग्रेस मंत्र्यानेच मुख्यमंत्री ठाकरेंना सुनावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button