ट्रॅक्टरला विक्रीचा चढता आलेख : १०.८६ टक्क्यांनी वाढ

Tractor Sales Rise

कोल्हापूर : कोरोना (Corona) महामारितही ट्रॅक्टर विक्रीची चढता आलेख कायम आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत १०.८६ टक्क्यांनी वाढ झाली. मागील काही वर्षांपासून ट्रॅक्टर विक्री (Tractor Sales Rise) सातत्याने वाढ होत आहे. चांगल्या मान्सूनमुळे पोषक वातावरणाने पीक उत्पादनात वाढ झाल्याचे तज्ञ सांगतात. सध्या शेतकऱ्यांना सहज मिळत असलेला पतपुरवठा आणि बिगर शेती कामासाठी वाढलेला ट्रॅक्टरचा वापर यामुळे विक्रीत वाढ होत आहे. कोरोना महामारीत शेत मजूरांचा तुटवडा हेही ट्रॅक्टर खरेदीमागील एक कारण आहे. २०१७पासून ट्रॅक्टर विक्रीचा चढता आलेख जून २०२० पर्यंत कायम असल्याचे आकडेवारी सांगते.

ही बातमी पण वाचा:- बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 टक्के वाढ

ट्रॅक्टर विक्री ही प्रामुख्याने पाऊस आणि त्यावर पिकणाऱ्या शेतीवर अवलंबून असते. चांगला मॉन्सून नसेल तर याचा परिणाम उद्योगावर होतो. २०१४ साली ६ लाख ९६ हजार ८२८ ट्रॅक्टर विक्रीचा आकडा पार झाला. यानंतर २०१५ व २०१६ या वर्षांत चांगला मॉन्सून झाला नाही परिणामी मागील वर्षीपेक्षा विक्रीत १० टक्के आणि ९ टक्के घट झाली होती. यानंतर ट्रॅक्टर विक्रीने एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ट्रॅक्टर उद्योगाने विक्रीमध्ये गरुड झेप घेत १६.६ टक्के वाढ नोंदविली आहे. या कालवधीत देशांतर्गत ६ लाख ५९ हजार १७० ट्रॅक्टर ची विक्री झाली होती. ही वाढ २०१९ आणि कोरोना महामारीत जून २०२० पर्यंत कायम राहिली आहे.

एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात महिंद्रा ॲन्ड महिंद्रा लि. (Mahindra & Mahindra Ltd.) आणि इस्कॉर्टस् लि. (Escorts Ltd.) या दोन्ही कंपन्यांच्या देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत १८ टक्के आणि १७.५ टक्के वाढ झाली होती. ती यंदाच्या वर्षीही कायम आहे. जून महिन्यात देशभरात ४० हजार ९१३ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. यंदा १०.८६ टक्क्यांची वाढ नोंदवून ही विक्री ४५ हजार ३५८ पर्यंत गेली आहे. एमजी मोटर्सने जूनमध्ये दोन हजार युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी ४ हजार ५१९ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. यात वाढ होऊन यावर्षी राज्यात ४ हजार ७४९ टॅक्टरची विक्री झाली आहे. २०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि पूरक व्यवसायाला मदत करण्यासाठी ६३८ अब्ज रुपयांची तरतूद केली. तरतूद केलेल्या निधीची उपलब्धता वेळेवर झाल्याने ट्रॅक्टर्स आणि शेती अवजारांची मागणी वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER