प्रजासत्ताकदिनी शेतक-यांची ट्रॅक्टर रॅली

Delhi Farmers Tractor Rally

नवी दिल्ली :  गेले महिने दोन महिने होत आहेत शेतकरी नवीन कृषी (Agriculture Law) कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत आहेत. आज भारताच्या इतिहासात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनी शेतकरी आपल्या न्यायासाठी दिल्लीत आंदोलन करताना दिसणार आहेत. आपल्या न्याय मागण्य़ांसाठी शेतकरी आज ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. मागील कित्येक दिवसांपासून शेतकरी या रॅलीची तयारी करत आहेत. 72 व्या प्रजासत्ताकदिनी (Republic day) दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार आहेत. तसेच, हजारो ट्रॅक्टरची रॅलीही यावेळी काढण्यात येणार आहे.

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी प्रजासत्ताकदिनीच ट्रॅक्टर रॅली काढणार असल्यामुळे दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना रॅलीचा मार्ग निश्चित करुन देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना काही गाईडलाईन्सही सांगितल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी रॅलीमध्ये एकूण 5000 शेतकऱ्यांना सामील होण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच, ट्रॅक्टर रॅलीमध्ये जास्तीत जास्त 5000 ट्रॅक्टरचा समावेश करता येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. ही रॅली दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेतच काढली जावी असेही दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना सांगितले आहे. तसेच रॅलीदरम्यान संमतीविना लाऊडस्पीकरवर भाषण देण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

ट्रॅक्टर रॅलीमध्ये सामील होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, ट्रॅक्टर्सच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपायोजना केल्या आहेत.पोलिसांनी दिल्ली शहर, तसेच दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा वाढवलेली आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड समाप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरवात होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER