वर्षपूर्तीचा आनंद अजून संपायच्या आत काँग्रेस नेत्यांचे इशारे सुरू; भाजपचा टोला

keshav upadhyay

मुंबई : राराज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस पुन्हा एकदा दुखावला गेल्याचे पुढे आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यानं महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती.

त्यावरूनच काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात असतानाच काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. आता यावरून भाजपानं त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद अजून संपायच्या आत काँग्रेस नेत्यांचे इशारे सुरू झाले. ” असं म्हणत भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER