महाराष्ट्र लॉक डाऊनच्या दिशेने, दिवसभरात आढळले २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यातील करोना (Corona) संसर्गाचा वेग दिवसेंदिवस पुन्हा एकदा अधिकच झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात २३ हजार १७९ नवीन करोनाबाधित वाढले असून, ८४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात ५३ हजार ८० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ टक्के एवढा आहे. याशिवाय, राज्यात आज रोजी एकूण १,५२,७६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. ही परिस्थिती पाहता आता राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणांकडून करोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनेक शहारांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. याशिवाय, लसीकरणाचा वेग आणखी वाढवणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सांगितलेलं आहे. दरम्यान,

आज ९ हजार १३८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २१,६३,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.२६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर ६ हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER