शॉपिंग करण्याची हौस आहे ? मग करा अजमेरची सैर

tourist spot-ajmer

अजमेर :- तुम्हाला जर वेग वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथले वैशिष्ट असलेल्या वस्तू खरेदी करण्याची हौस असेल तर मग तुम्ही एकदा तरी अजमेरला भेट द्या. अजमेर हे मुस्लिम बांधवांसाठी श्रद्धेचं स्थान आहे कारण इथे सुफी संत मोईनुद्दीन चिस्ती यांचा प्रसिद्ध दर्गा आहे. या दर्ग्याला भेट देण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर विदेशातून भाविकच नाही तर सर्व जातीधर्माचे पर्यटक येत असतात. अजमेर या दर्ग्याबारोबारच मनपसंत खरेदीसाठीही प्रसिद्ध असून येथे शॉपिंगसाठी अनेक बाजार आहेत जेथे सर्व प्रकारचे सामान विकले जाते.

ही बातमी पण वाचा : औरंगाबाद हिंसाचार; दंगल घडवण्यासाठी शस्त्रांची ऑनलाईन शॉपिंग

ajmer chudibajar

या ठिकाणचा चुडी बाजार हा अत्यंत प्रसिद्ध आहे येथे काच, मेटल, स्टील, प्लास्टिक बरोबर सोन्या चांदीच्या असंख्य प्रकारच्या बांगड्या मिळतात. महिला वर्गाच्या हौसेला हा बाजार पुरून उरतो. या ठिकाणी पाहायला मिळणाऱ्या बांगड्या या कदाचितच तुम्हाला दुसरीकडे पाहायला मिळेल. विशेष म्हणजे अगदी कमी किमतीत इथे उत्तम दर्जाच्या बांगड्या मिळत असल्याने अनेक महिला वर्ग कपड्यांवर मॅचिंग असे बांगड्या इथून खरेदी करतात.

यासोबतच महिला मंडी नावाचा आणखी एक बाजार असाच लोकप्रिय असून त्यात महिलांना लागणाऱ्या सर्व वस्तू मिळतात. उत्तम प्रकारचे खास राजस्थानी कपडे, बॅग्स, चपला, मोजड्या येथे जितक्या व्हरायटीमध्ये मिळतील तितक्या अन्यत्र मिळणे अवघड. नाला बाजारात पारंपारिक कपडे, टाय डाय दुपट्टे, साड्या, मोजडी येथे मिळतातच पण शॉपिंग करून दमला असला तर टेस्टी स्ट्रीट फूडचा आनंद घेता येतो.

ही बातमी पण वाचा : ऑनलाईन शॉपिंगने 48 हजाराचा कॅमेरा मागितला, निघाले पाईपचे तुकडे

दर्गा बाजार हा आणखी एक बाजार सतत गर्दीने फुललेला असतो. येथे ज्वेलरी, अँटिक वस्तू, पेंटिंग, लाकडी समान, जुती याची चांगली रेंज मिळते. येथे विशेष म्हणजे घासाघीस करण्याचे समाधानही मिळू शकते. नॉनव्हेजप्रेमींसाठी येथील बिर्याणी आणि मटण करी जिव्हा तृप्ती करणारी ठरत.