पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

aaditya thackeray - COVID Positive - Maharastra Today

मुंबई : पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसंच कोरोना चाचणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ट्विटरद्वारे आदित्य ठाकरेंनी ही माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. आपण सर्वांनी मास्क घालावा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, अशी विनंती आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे नागपूरहून परतले होते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात त्यांनी तीन दिवस मुक्काम केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER