‘हे आत्मविश्वासी नव्हे, आत्मघातकी सरकार !’ कोकण दौऱ्यात फडणवीसांचे टीकास्त्र

Fadnavis on thackeray govt

रत्नागिरी :- कोरोना (Corona Virus) महामारीसह तौक्ते चक्रीवादळानेही (Tauktae Cyclone) काही राज्यांत थैमान घातले आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ‘हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे.’ असे टीकास्त्र फडणवीसांनी आघाडी सरकारवर (Thackeray Govt) सोडले. ‘कोकणात सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

काहीही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे हे नेहमीचे झाले आहे. ६०० गावांतील लाईट गेली, ६०-७० हजार कुटुंबं अंधारात होती. शेतीचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अद्याप मिळाली नाही. आता तरी सरकारने मदत करावी.’ अशी विनंती फडणवीस यांनी कोकण दौऱ्यादरम्यान केली आहे. “कोणत्याही गोष्टीला अर्धसत्य बोलायचे, रोज सकाळी टीव्हीसमोर जाऊन खोटं बोलायची सवय झाली आहे. या चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातमध्ये होता. तिथे जास्त नुकसान आणि जास्त मृत्यू झाले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) गुजरातचा दौरा केला. गुजरातला जशी मदत जाहीर केली, याचप्रमाणे इतर राज्यांनाही अशीच मदत केली जाईल. त्यामुळे ठाकरे सरकारला काही झाले की, केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची सवय झाली आहे.” असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

…तर आत्मघातकी सरकार
“कोरोना महामारीमध्ये हे सरकार सपशेल नापास झाले आहे. हे आत्मविश्वासी नाही तर आत्मघातकी सरकार आहे. मृत्यूचे आकडे अजूनही लपवले जात आहेत. कधी तरी तुम्हाला आकडे सांगावेच लागतील. सगळे काही देऊनही तुम्ही परत केंद्रालाच नावे ठेवता. वाईट झाले की केंद्राची जबाबदारी. ही सगळी स्क्रिप्ट रेडी आहे. दररोज उठायचे आणि हेच बोलायचे.” अशी टीका फडणवीसांनी केली.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांच्या कामाचे शंकरराव कोल्हेनी केले कौतुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button