तौक्ते प्रभाव : रत्नागिरीत चौवीस तासात ११ इंच विक्रमी पाऊस

Heavy Rain

रत्नागिरी :- काल सायंकाळी साडेआठपासून आज सकाळी साडेआठपर्यंतच्या चौवीस तासात सरासरी १३२ मिमी तर फक्त रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यात २७४ मिमी म्हणजे ११ इंच पाऊस पडला. हा रत्नागिरीत २४ तासात पडणाऱ्या पावसाचा विक्रम आहे.

रविवारी रात्रभर वादळाचा तडाखा रत्नागिरीकरांना जाणवला. किनारी भागातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. वारा घोघावण्याचा जोरदार आवाज, समुद्राच्या लाटांची गाज, पत्रे असलेल्या छतांची धडकी भरवणारी थरथर यात अवघी रात्र जागून काढावी लागली.

राजापूर तालुक्यात सर्वात कमी २०८, लांजा तालुक्यात १६२, गुहागरात १२० मिमी पाऊस झाला आहे. काल दुपारी २ वाजेपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी सकाळी ११ वाजता सूर्यदर्शन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button