सांगली जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधीतांची संख्या झाली 101

गुरुवारी तीन नवे

total number of corona patients in Sangli was 101

सांगली : सांगली जिल्ह्यात गुरुवारी नवीन तीन रुग्ण कोरोना बाधित झाले असून आतापर्यंत एकूण 101 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे .उपचारा खालील रुग्णांची संख्या 44 झाली आहे असून 54 रुग्ण कोरोणामुक्त झाले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ही बातमी पण वाचा:- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५९ हजार ५४६-राजेश टोपे

बाधितांपैकी चार रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. तर गुरुवारी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत . नवीन बाधितामध्ये गोरेवाडी तालुका खानापूर येथील मुंबईहून आलेल्या 45 वर्षे पुरुष, नवी मुंबईहून आलेला 57 वर्षीय नेरली तालुका कडेगाव येथील पुरुष, तर नरसिंह गाव तालुका कवठेमंकाळ येथील कोरोणाबाधित रुग्णाची आई (26 वर्षीय) कोरोणा बाधीत झाली आहे.

ज्या रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे यामध्ये नेर्ली , ता. कडेगाव येथील 57 वर्षीय पुरुष असून सदर व्यक्ती मुंबईवरून आलेला प्रवासी आहे. सदरचा रुग्ण इनव्हेजिव व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलेला आहे . किडेबिसरी, ता. सांगोला येथील 48 वर्षीय पुरुष ऑक्सीजनवर उपचार सुरू आहेत. खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षीय पुरुषावर ही नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटर वर उपचार सुरू आहेत. तर सुलतानगादे तालुका खानापूर येथील 57 वर्षीय महिलेला ऑक्सिजन’वर ठेवण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .

कोरोनामुक्त झाले असून यात करणार कर्नाळ तालुका मिरज येथील 28 वर्षीय पुरुष , अंकले तालुका जत येथील 32 वर्षे पुरुष, रेड तालुका शिराळा येथील 42 वर्ष महिला, 49 वर्षे पुरुष , कुंडलवाडी तालुका वाळवा येथील 70 वर्षे पुरुष तर मरगळे वस्ती तालुका आटपाडी येथील 60 वर्षे पुरुष यांचा समावेश आहे .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ .अभिजित चौधरी यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER