भारतात आज कोरोनाची रुग्णसंख्या ६,२५५४४ ; तर महाराष्ट्रात १८६६२६

मुंबई : भारतात आज १ जुलै रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६,२५,५४४ आहे. १८,२३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत नवे रुग्ण २०९०३ आढळले तर १८२१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा १८६६२६ रुग्ण, गेल्या २४ तासांत ६३३० नवे रुग्ण, एकूण मृत्यू ८१७८ आणि गेल्या २४ तासांत ११० जणांचा मृत्यू झाला आहे , अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,०५,३३,७७९ झाली आहे. एकूण ५,१२,८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ४७८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे व नवे १,७६,१०२ रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी अनालिटिक्स मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने तयार केली आहे. याचा डेटा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने संकलित केला आहे. आकडेवारी ३ जुलैच्या सकाळी १० वाजेपर्यंतची आहे.

दरम्यान कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर जगात ४.८७, भारतात २.९१ आणि महाराष्ट्रात ४.३८ टक्के आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER