भारतात आज कोरोनाची रुग्णसंख्या ५८५४९३ ; तर महाराष्ट्रात १७४७६१

corona virus

मुंबई : भारतात आज १ जुलै रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५,८५,४९३ आहे. १७,४०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत नवे रुग्ण १८,६५३ आढळले असून गेल्या २४ तासांत ५०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा १,७४,७६१ रुग्ण, गेल्या २४ तासांत ४८७८ नवे रुग्ण, एकूण मृत्यू ७८५५ आणि गेल्या २४ तासांत ९५ मृत्यू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर जगात ४.९५, भारतात २.९७ आणि महाराष्ट्रात ४.४९ टक्के आहे. दरम्यान, जगात रुग्णांची संख्या १,०१,८५,३७४ झाली आहे. एकूण ५,०३,८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३९४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे व नवे १,६३,८६५ रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी अनालिटिक्स मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने तयार केली आहे. याचा डेटा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने संकलित केला आहे. आकडेवारी १ जुलैच्या सकाळी १० वाजेपर्यंतची आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER