कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सर्वोच्च प्राधान्य : अनिल देशमुख

Maharashtra Today

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) कायम प्राधान्य राहिले आहे. कायद्याची चौकट मोडणाऱ्या दोषींवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधानसभेत सांगितले. कायदा व सुव्यवस्था या विषयावर नियम २६० अन्वये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर अनिल देशमुख यांनी उत्तर दिले.

मविआ सरकारने नेहमीच कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य दिले आहे. गेल्या वर्षात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ नसल्याची राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थाच्या (एनसीआरबी) अहवालात नमूद करण्यात आली आहे. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) (NIA) करत आहे.

तर मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्युप्रकरणातील तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे. पोलीस अधिकारी सचिन वझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात आली आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER