‘टुलकिट’प्रकरण : ट्विटर म्हणाले, ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’; संबित पात्रांवर ट्विटरची कारवाई

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) काही दिवसांपासून ‘टुलकिट’प्रकरणावरून वाद सुरू आहेत. हा प्रकरण राजकारणात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणी ट्विटरने भाजपचे नेते आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने पात्रांच्या ट्विटला ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ (manipulated media) म्हटले आहे. म्हणजे, ट्विटनुसार संबित पात्रा (sambit patra) यांनी केलेले ट्विट हे ‘तथ्यात्मकदृष्ट्या’ योग्य नाही.

ट्विटरने ‘टुलकिट’प्रकरणी कारवाई करताना संबित पात्रांच्या ट्विटला ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ म्हटले आहे. ट्विटरच्या पॉलिसीनुसार एखाद्या ट्विटची माहिती अचूक नसेल आणि उपलब्ध माहिती चुकीची असेल, तर ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ प्रकारचा लेबल लावला जातो. व्हिडीओ, ट्विट, फोटो किंवा इतर कोणत्याही कंटेन्टमध्ये हे लेबल लावले जाते. या आधी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या अनेक ट्विटला हे लेबल लावण्यात आले आहे. त्यानंतर ट्रम्प यांचे अकाऊंट कायमचे रद्द करण्यात आले होते.

पात्रांचे नेमके ट्विट काय?

भाजप नेते संबित पात्रा यांनी १८ मे रोजी ट्विट केले. यात कोरोना संकटात काँग्रेसकडून ‘टुलकिट’द्वारा मोदींची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. ट्विटमध्ये दावा केला गेला की, पीआर कंपनी काही बुद्धिजीवींच्या माध्यमातून मोदीविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

आरोप-प्रत्यारोप सुरूच

‘टुलकिट’प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. भाजपचे सर्व आरोप काँग्रेसने फेटाळले. एवढेच नव्हे, तर भाजपच्या नेत्यांविरोधात FIR दाखल करण्यात यावा, म्हणून काँग्रेसने पोलीस आयुक्तांना चिठ्ठीही लिहिली आहे. काँग्रेसच्या NSU विद्यार्थी संघटनेने पात्रांविरोधात केसही दाखल केली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button