टूलकिट प्रकरणामुळे भाजपचा खोटेपणा उघड, राष्ट्रवादीचा दावा

bjp-ncp

मुंबई :- टूलकिट प्रकरणावरुन (Toolkit Case) सध्या भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) असा सामना रंगला असताना आता या वादात राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. टूलकिटच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने (NCP) भाजपवर निशाणा साधत गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी भाजपचा खोटेपणा उघड झाला असून देशात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

मलिक यांनी सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ शेअर करून ही टीका केली आहे. बनावटगिरी करून… मीडियाला मॅनेज करून… लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजप मीडिया हाऊस निर्माण करत असून तो त्यांचा अधिकार आहे. परंतु, दोन्ही टूलकीट खरे आहे का? याचा भाजपने खुलासा करायला हवा. देशभर बनावट लेटरहेड वापरून टूलकीट तयार करण्यात आले आहेत, हे लोकं सांगत आहेत. त्यामुळे भाजपची बनवटगिरी पुढे आली आहे.

भाजपने जो बनावटगिरी करून देशभर द्वेष निर्माण करण्यासाठी बनावट लेटरहेडचा वापर केला. त्यावर ट्वीटर इंडियाने मॅन्यूप्लेटेड इंडियाचा टॅग लावला आहे. भाजपकडे याबाबतचे खरी कागदपत्रे असतील तर दुरुस्त करून घ्यायला हवी होती. परंतु उलट ट्विटरवर भाजप प्रश्न उपस्थित करत आहे. खरे कागद असतील तर ते दाखवा नाहीतर होणार्‍या कारवाईला सामोरे जा, असा सल्लाही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button