शब्दांविणा खुप काही; नितेश राणेंकडून बाळासाहेबांना अनोखी आदरांजली

Nitesh Rane-Balasaheb Thackeray

मुंबई : राणे आणि शिवसेना (Shivsena) यांचे नाते महाराष्ट्र जाणतो. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. राज्यभरातून मराठी कालाविश्वासह, राजकीय, सामाजिक स्तरातून त्यांना आदरांजली वाहन्यात येत आहे.

नितेश राणे यांनीही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचा फोटो ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.
विशेष म्हणजे, एरवी शिवसेनेवर आगपाखड करणारे राणे पुत्र नितेश (Nitesh Rane) यांनी बाळासाहेबांचा कपाळावर भगवारंग लावलेला रुबाबदार आणि शब्दात व्यक्त न होता फोटो पोस्ट करून आदरांजली वाहिली आहे.

या फोटोत बाळासाहेबांच्या डोक्यावर भगवा रंग लावलेला आहे. पांढरी शाल ओढलेली आहे त्यावर भगव्या रंगाचेच चिन्ह दिले आहे.

दरम्यान, राणे कुटुंब शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray)टिकेचे आसुड ओढतात मात्र, आजपर्यंत त्यांनी बााळासाहेबांना विशेष आदर दिल्याचेच राज्याने पाहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER