“टू मच डेमोक्रॉसी” उर्मिला मातोंडकरांनी मोदींवर साधला निशाणा

Urmila Matondkar-PM Modi

मुंबई :- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तिने  थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्राचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यावरून उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर केंद्राचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आलं आहे, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी दिली. केंद्राने हा निर्णय परस्पर घेतल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसने या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.

‘राज्यात जेव्हा निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी मोठ्या सभा घेण्यात आल्या. म्हणजे संसद वगळता सर्व देश खुला आहे. खूपच लोकशाही आहे (टू मच डेमोक्रॉसी). ’ असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. असे ट्वीट करत उर्मिला मातोंडकरने मोदींवर निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER